Friday, August 8, 2014

Krantiveer Sangolli Rayanna...Tujhe Salaam !!!

 जय हिंद ! जय चेन्नम्मा राणी !! जय क्रांतिवीर रायन्ना !!!
क्रांतिवीर संगोळी रायन्ना
( जन्म : १५ ऑगस्ट १७९८ - मृत्यू : २६ जानेवारी १८३१ )

क्रांतिवीर संगोळी रायन्नाया स्वातंत्र्ययोद्ध्याचा १५ ऑगस्ट १७९८ हा जन्मदिवस... पुढे जाऊन हा भारताचा स्वातंत्र्यदिवस ठरावा आणि प्रजेच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या या वीराला ज्या दिवशी फाशी देण्यात आली तो दिवस २६ जानेवारी १८३१ पुढे जाऊन हाचं भारताचा प्रजासत्ताक दिन ठरावा यासारखा एकमेव्द्वितीय योगायोग म्हणजे जणू भारत-भारतीने आपल्या वीरपुत्रास देलेली हि आदरांजलीच म्हणावी लागेल...

रायन्नायांचा जन्म १५ ऑगस्ट १७९८ रोजी संगोळी - बेळगाव या गावी एका सर्वसामान्य धनगर / कुरूबा कूटूंबात झाले. क्रांतिवीर संगोळी रायन्नाहे कित्तूर साम्राज्याचे सरसेनापती! ब्रिटीशांविरोधात सलग-सतत सहा वर्षे लढून, त्यांना 'सळो की पळो' करून सोडणारे आणि वेळोवेळी संकटात आणणारे एक महान क्रांतिकारक ! इंग्रजांना आव्हान देणारा योद्धा ! स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देऊन, फासावर जाणारे स्वातंत्र्यवीर ! मरण समोर असताना देखील पुन्हा जन्म घेऊन इंग्रजांना भारतातून बाहेर काढण्याची इच्छा व्यक्त करणारे भारतमातेचे सच्चे वीरपुत्र ! त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल घेतलेला हा पुढील आढावा...

कित्तूर या राज्याची राणी होती राणी चेन्नम्मा. तिचा विवाह मल्लासर्जा यांच्याशी झाला होता. त्यांना एक मुलगा होता. परंतु १८२४ मध्ये त्याचे निधन झाले. त्यामुळे राणी चेन्नम्माने शिवलिंगप्पा याला दत्तक घेतले आणि गादीवर बसवले. परंतु ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने या दत्तकपुत्राला मान्यता दिली नाही आणि ५ डिसेंबर १८२४ रोजी कित्तुरू किल्ल्यावरील स्वराज्याचा ध्वज उतरवून ब्रिटीशांनी युनियन ज्याक फडकवला. स्वाभिमानी राणी चेन्नम्माने ब्रिटीशांविरुद्ध युद्ध पुकारले. हेच ते कित्तुरचे युद्ध. या युद्धात राणी चेन्नम्मा स्वतः घोड्यावर बसून ब्रिटीशांशी लढली. यावेळी राणी चेन्नम्माचा प्रमुख सेनापती होता संगोळी रायन्ना. राणी चेन्नम्मा संगोळी रायन्नास आपला पुत्र मानीत असत. कित्तूरची राणी चन्नमा आणि इंग्रज यांच्यात युद्धास सुरवात झाली. स्वाभिमानी राणी चेन्नम्माने ब्रिटीशांविरुद्ध युद्ध पुकारले. हेच ते कित्तुरचे युद्ध. या युद्धात राणी चेन्नम्मा स्वतः लढल्या तर संगोळळी रायन्ना यांनी पराक्रमाची शर्त केली. परंतु दुर्दैवाने राणी चेन्नम्मा यांना पकडण्यात आले. मात्र संगोळी रायन्ना यांनी गनिमी काव्याने ब्रिटिशांना चांगलीच झुंज दिली. त्यांनी गोरगरीब, सामान्य प्रजेतून सैन्य उभे केले. त्यांच्या मदतीने त्यांनी सरकारी मालमत्तेवर हल्ले केले. ब्रिटिशांचे खजिने लुटले व जनतेत वाटून टाकले. जे सावकार आणि जमीनदार गरिबांना लुबाडत होते, त्यांचे जमिनीची कागदपत्रे जाळून टाकली. अशा प्रकारे संगोळी रायन्ना सामान्य जनतेला उठाव करण्यास प्रोत्साहित केले. रायन्नाने ब्रिटीशांविरुद्ध पुकारलेल्या असहकार आंदोलनास जनतेचा, अनेक गावांचा पाठींबा मिळाल्याने ब्रिटीशांची अक्षरश: झोप उडाली होती. रायन्ना’'ने पोर्तुगीझांकडून, कोल्हापूर संस्थानाकडून ब्रिटीशांविरुद्ध लढण्यासाठी पाठींबा मिळण्याचा प्रयत्न हि केला होता. रायन्नास पकडण्यासाठी अनेक बक्षिसे, आमिषे ब्रिटीशांनी जाहीर केले होते. पण त्याचा काही एक उपयोग झाले नाही, कारण प्रजेची साथ रायण्णास होती. रायन्नाने ब्रिटीश सैनिक कॅम्पवर जोरदार हल्ले केले, पुणे - मुंबई पोस्टल सेवा बंद पाडल्यामुळे ब्रिटीश सरकारला रेवेन्यू गोळा करून मुंबईला पाठविणे फार कठीण झाले होते. रायन्नाने ब्रिटीशांविरुद्ध उभी केलीली हि स्वराज्य चळवळ हि आजच्या कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा प्रदेशाच्या काही भागात जावून पोहोचली होती. परंतु फितुरी आणि दगा हे भारतीय समाजावरील कलंक आहेत. अखेर दगा करूनच ब्रिटीशांनी संगोळी रायन्ना यांना पकडले. स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणारा एक थोर योद्धा जेरबंद झाला. २६ जानेवारी १८३१ रोजी नंदगड येथे त्यांना फाशी देण्यात आली. जेव्हा संगोळी रायन्ना यांना पकडण्यात आले तेव्हा त्यांच्या तोंडी शब्द होते, “या भूमीवर परत एकदा जन्म घेवून ब्रिटिशांना या देशातून हाकलून लावणे हीचं माझी शेवटची इच्छा आहे.मरण समोर दिसत असूनही आपल्या मातीच्या स्वातंत्र्यासाठी पुन्हा एकदा जन्म घेण्याची इच्छा बाळगणारे संगोळी रायन्ना खरोखर थोर क्रांतिकारक होते...

नंदगड येथे संगोळी रायन्ना यांचे स्मृतीस्थळ आहे. या स्मृतीस्थळास भेट देण्यास, दर्शन घेण्यास दूर-दूरच्या खेडोपाड्यातील राष्ट्रीय समाजातील विविध जाती - जमातीचे लोक येथे येतात. रायन्नासारखा वीरपुत्र आमच्या पोटी व्हावा, असा नवस नवविवाहित करून आणि प्रतिक म्हणून समाधी जवळ असलेल्या वडाच्या झाडावर लहान पाळणे बांधतात. यावरून सर्व राष्ट्रीय समाजा'मध्ये रायन्ना'प्रति कसे प्रेम आहे हे मात्र याबाबतीतून येथे दिसून येते.

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवजी जानकर क्रांतीवीर संगोळी रायन्नाच्या कार्याचा प्रसार करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. अशा थोर (पण दुर्लक्षित असलेले/ठेवेलेले) क्रांतीकारी संगोळी रायन्ना यांचे कार्य भारतभर पसरवण्यासाठी संघटीत प्रयत्न करणे गरजेचे आहे...

- प्रकाश पोळ, मिलिंद डोंबाळे, सनी अक्कीसागर

क्रांतिवीर संगोळी रायन्नाविषयी अधिक माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया खालील लिंक पहावे >>>
http://rashtriyasamaj.blogspot.in/2012/08/sangolli-rayanna-foremost-freedom.html

No comments:

Post a Comment