Wednesday, August 7, 2013

मी निघालोय क्रांती घडवाया...

मी निघालोय क्रांती घडवाया,
आपल्याविरोधात ज्यांनी राजकारण केलं
त्यांना तुडवाया, त्यांना बडवाया निघालोय,
सोबत तुम्ही येणार का...
सुर्याला सांगाया मि चाललोय,
पावले आमची केव्हांच बदलल्यात
किरणांची साथ घ्यायची म्हणुन निघालोय.
सोबत तुम्ही येणार का...
अंगवळणी पडलेला हा व्यवहार
कायमचाच बंद करुन टाकायला
धाडसानं मि पुढं-पुढं निघालोय.
सोबत तुम्ही येणार का...
जिवाचं काय बर-वाईट होईल
याची काळजी न करताच धावतोय
शर्यत जिंकायचीच म्हणुन निघालोय,
सोबत तुम्ही येणार का...
अंधारावर स्वारी करायला आताशी
संधी चालुन हाती आलीय
त्या संधीच सोनं करायला निघालोय,
सोबत तुम्ही येणार का...
हरण्या-जिंकण्याची पर्वा न करता
लढणार हाय मि त्वेशानं, जोशानं,
शेवटच्या श्वासापर्यंत म्हणुन मि निघालोय,
सोबत तुम्ही येणार का...
 साभार ~ 'दत्ता कोकरे' यांच्या 'आता पेटुन उठा' या कविता संग्रहातुन...

No comments:

Post a Comment