Thursday, May 30, 2013

महाराणी अहिल्याबाई होळकर जयंती महोत्सव - 31 मे 2013

चोंडी - अहमदनगर ( प्रतिनिधी )
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 288 व्या जयंती निमित्त राष्ट्रीय समाज पक्षा’तर्फे अहिल्या जन्मभूमि चोंडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र येथे ‘महाराणी अहिल्याबाई होळकर जयंती महोत्सव ‘ चे दिनांक 31 में 2013 रोजी दुपारी 1.00 वाजता आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा. महादेव जानकर यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे. मा. छगनराव भुजबळ - सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री यांचे शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून कार्यक्रम अध्यक्षपदी मा. गोपीनाथ मुंडे - विरोधी पक्ष उपनेते लोकसभा विराजमान असणार आहेत. विशेष अतिथि म्हणून मा. जयंत पाटील - महासचिव शेकाप, मा. रामदास आठवले अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, मा. एच. एम. रेवन्ना - माजी मंत्री कर्नाटक राज्य यांना निमंत्रित केले आहे. प्रमुख अतिथि म्हणून मा. देवेन्द्र फडणवीस अध्यक्ष - भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र, मा. आमदार गणपतराव देशमुख, ज्येष्ट सदस्य - महाराष्ट्र विधानसभा, मा. आमदार अनिल(अण्णा) गोटे, अध्यक्ष- लोकसंग्राम पार्टी, मा. आमदार चंद्रकांत पाटील, मा. आमदार प्रकाश(अण्णा) शेंडगे, मा. गोविंद घोळवे सचिव - श्रीक्षेत्र भगवानगड, मा. आमदार प्रा राम शिंदे, मा. माजी खासदार सुभाष देशमुख, मा. आमदार संभाजी पवार, मा. आमदार सुरेश खाडे, मा. आमदार सौ. पंकजा पालवे, मा. प्रा. सौ. सुशीलताई मोराळे, नेत्या, मा. उत्तमराव जानकर, चेअरमन - शे.स.सा.कारखाना माळशिरस, मा. नारायण आबा पाटील, नेता करमाळा आदि. नेते तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित रहाणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.

याशिवाय मा.कैलाश दिवान - राष्ट्रीय महासचिव रासपा (प. बंगाल), मा.ललितभाई पटेल - अध्यक्ष रासपा गुजरात, मा.एड. संजय वाघमोडे - महासचिव रासपा गुजरात, मा. गणेशराम देवासी - अध्यक्ष रासपा कर्नाटक, मा.एम जी मणिशंकर - अध्यक्ष रासपा तमिळनाडु, मा.गोपाल कहार - अध्यक्ष रासपा आसाम, मा. मोहनकुमार - युवा अध्यक्ष रासपा कर्नाटक, मा. आशिष विश्वकर्मा -युवा अध्यक्ष रासपा मध्य प्रदेश आदि. महाराष्ट्र आणि इतर सर्व राज्याचे पक्ष कार्यकर्ते, पदाधिकारी व अनेक मान्यवर मंडळी मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत. मा.पुंडलिकमामा काळे - अध्यक्ष महाराष्ट्र रासपा निमंत्रक असून श्री दशरथ राउत - उपाध्यक्ष महाराष्ट्र रासपा, श्री बाळासाहेब दोडतले - जिल्हा परिषद सदस्य रासपा (बीड) , श्री भगवानराव सानप - जिल्हा परिषद सदस्य रासपा (परभणी) , अॅड. शफीकभाई परकार - नेता रासपा, श्री निखिल भातंब्रेकर - नेता रासपा, श्री सचिन माने - नेता रासपा, श्री दिगंबर राठोड - नेता रासपा तसेच रासपा राष्ट्रीय कार्यकारिणी, महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी आणि सर्व प्रदेश - राज्य कार्यकारिणीनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

No comments:

Post a Comment