Saturday, April 6, 2013

कर्नाटक असेंब्ली निवडणूक – २०१३...

कर्नाटक असेंब्ली निवडणूक २०१३...

र्नाटक विधानसभा निवडणूक - २०१३ चे बिगुल वाजले आहे. जातीय बेरीज – वजाबाकी चे समिकरणे मांडून राज-गणित समोर ठेवत आहेत. याचा कर्नाटक राज्यातील राजकारणात लिंगायत आणि वोक्कालिगा जातींचा प्रभाव आहे. गेल्या काही वर्षात कुरबा या तिसर्या मोठया जातीचा शिरकाव यामधे होत आहे. सिद्धरामय्या याना मुख्यमंत्री पदाचे गाजर दाखवित कुरबा समाजाला कॉंग्रेसकडे वळवुन कर्नाटक विधानसभा ताब्यात घेण्याचा प्रयत्न कॉंग्रेस करीत आहे. या पार्श्वभुमिवर कर्नाटक विधानसभा – जातीचे राजकारण – त्यात कुरबर – धनगर समाजाचे स्थान तसेच बेळगाव जिल्ह्यातील  कुरबर-धनगर समाजाचे विधानसभीय राजकारणातील स्थान याचा शोध-बोध या लेखातून घेतला जाणार आहे. याच बरोबर महादेव जानकर संस्थापित राष्ट्रीय समाज पक्षातर्फे २००८ साली लढविल्या गेलेल्या रा.स.पा. च्या “रामदुर्ग पॅटर्न“ चा उहापोह घेतला जाणार आहे... कर्नाटक असेंब्ली निवडणूक २०१३

 कुरबर – धनगर समाजाचे राजकीय स्थान

 तसेच बेळगाव जिल्हा व रा.स.पा.चे रामदुर्ग पॅटर्न   

KARNATAKA ASSEMBLY POLLS-2013 SCHEDULE…   
निवडणुका कार्यक्रम...

Total Seats
224Issue of Notification 
10-Apr-13Last Date of Nomination
17-Apr-13Scrutiny of Nomination
18-Apr-13Last Date for withdrawal of Candidature
20-Apr-13Date of Polls
05-May-13Counting of Votes Hours of Poll
8 AM - 5 PMकर्नाटक राज्यात ५ मे २०१३ रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. मागील २००८ ची निवडणूक भाजपा – कॉंग्रेस – जेडीएस आणि इतर अशी लढली गेली. येडीयुराप्पांचा भाजप सत्तेवर आला. दक्षिणेवर भाजपाचा हा पहिला विजय होता. ब्राह्मण अनंतकुमार यांना बाजूला सारुन येडीयुरप्पा मुख्यमंत्री झाले. भ्रष्टाचारा आरोपात मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. येडीयुरप्पांच्या मागणीवरूनच वोक्कालिगा सदानंदगौडा मुख्यमंत्री झाले. नंतर त्यांच्याच मागणीवरूनच वोक्कालिगा सदानंदगौडाना खुर्ची सोडावी लागली. कुरबा के ईश्वरप्पाचा सहज पत्ता काटत लिंगायत जगदीश शेट्टर मुख्यमंत्री झाले. एवढे करुनही समाधान न झालेले येडीयुरप्पा शेवटी पक्षाबाहेर पडले. आता येडीयुराप्पांचा कर्नाटक जनता पक्ष आणि श्रीरामलुंचा बी एस आर कॉंग्रेस २०१३ च्या निवडणूक मैदानात नव्याने उतरले आहेत.कर्नाटक विधानसभा
एकुण विधानसभा जागा-224 
कर्नाटक विधानसभा निवडणूक - निकाल

2004

2008

पक्ष
जागा
मते %
जागा
मते %
कोंग्रेस
65
33.28
80
34.59
बिजेपी
89
28.49
110
33.86
जेडीएस
58
20.59
28
19.11
इतर
12
15.64
6
12.44

224
98
224
100


२५ मे २००८ रोजी मतदान झाले होते, आता ५ मे २०१३ रोजी मतदान होत आहे. या मधील कालखंडात बरेच पाणी वाहून गेले आहे. भ्रष्टाचार आणि संधिसाधूपणा हे मुद्दे सर्व प्रस्थापित पक्षीय बनले असल्याने तो आता खर्या अर्थाने निवडणूक मुद्दा बनला जात नाही. आचार संहिता मुळे `प्रचारा` लाच मुसक्या बांधल्याचे दिसते. वर्तमानपत्रे आणि टीवी-केबल यावरील “बातम्या” हेच निवडणूकीचे `प्रमुख प्रचार माध्यम` बनले आहे. मतदार, मतदारांचे ठेकदार यांच्याकडून विविध व्यक्ति, संस्था आणि संघठनांना पैसा आणि आमिषें पुरवली जात आहेत. परंतु तो रोखण्यात निवडणूक आचार संहिता यशस्वी झालेली दिसत नाही. पैसा आणि निवडणूका आता “एकार्थी” झाला आहे.   निवडणूकील्या `भ्रष्टाचारा` मधेच देशातील भ्रष्टाचाराचे `मुळ` आहे. परंतु या मुळाला जोपासणार्या व्यवस्थेला धक्का न लावता देशातील भ्रष्टाचार हटणार कसा, हाच हिमालयन प्रश्न आहे. तात्पर्य पैसा आणि माफिया याच्या जोरावर निवडणूका लढविल्या आणि जिंकल्या जात आहेत. हे असे सार्वत्रिक – वास्तविक चित्र संपूर्ण देशभर आहे. जाती बलाबल
%
लिंगायत
18
वोक्कालिगा
8
कूरुबा
12
मुस्लिम
11
एस सी
15
इतर
36

100

`जात फॅक्टर` ही निवडणूकीच्या राजकारणात महत्वाची मानली जाते. परंतु वास्तव काय आहे? संघठित आणि प्रबल जातीयांचेच भारताच्या आणि कर्नाटकाच्या राजकारणात प्रभाव दिसत आला आहे. अजागृत, असंघठित आणि दुर्बल जातींना `सत्ते` कडे जाण्यापासून लोकशाही भारतात आजपर्यंत तरी रोखले गेले आहे. कर्नाटक राज्यात सुरुवातीला सत्तेच्या राजकारणात लिंगायत जातीचे वर्चस्व होते.

नंतर वोक्कालिगा जातीचा प्रवेश होत गेला. वोक्कालिगा देवेगौडा मुखमंत्री – प्रधानमंत्री झाले. मुस्लिम – दलित यांचा आणि त्यांच्या नेत्यांचा वापर केवळ वोट बैंक म्हणून केला जात आहे. कर्नाटक राज्यात लिंगायत आणि वोक्कालिगा नंतर `कुरबा` ही सर्वात मोठी जात मानली जाते. वोक्कालिगा केवळ दक्षिण कर्नाटकमधे तर अनेक जातीत विभागलेला लिंगायत (धर्मिय की पंथिय की जातीय) उत्तर कर्नाटकमधे आढळतात. परंतु कुरबा संपूर्ण राज्यात आढळतो. म्हणूनच कुरबा सर्वात मोठया लोकसंख्येची जात असावी असे म्हणण्यास जागा आहे. १९३१ नंतर जनगणना न झाल्याने आणि जाती संख्येचे वास्तव आकडे समोर आले नसल्याने या म्हणण्यात तथ्य नाही, असे खात्रीपूर्वक म्हणता येत नाही.


कौन बनेगा मुख्यमंत्री !
सिद्धरामय्या – मल्लिकार्जुन खरगे की पुन्हा एकदा एस एम कृष्णा
कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री सिद्दरामया होणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. सिद्दरामया कुरुबा - धनगर समाजाचे आहेत. कर्नाटक राज्यात कुरुबा - धनगर समाजाची संख्या मोठी आहे. परंतु आजपर्यंत या समाजातुन कोणी मुख्यमंत्री पदावर गेलेले नाही. आपले पुत्र कुमारस्वामीला मुख्यमंत्री पदावर बसविनार्या माजी पंतप्रधान देवेगौड़ा आणि सिद्दरामया यांच्यामध्ये याच कारणातुन मतभेद झाले होते. सिद्दरामयांनी जेडीएस सोडली, कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला. विरोधी पक्ष नेते म्हणून ते आता कॉंग्रेसचे नेतृत्व करीत आहेत. भारतामध्ये कुरुबा - धनगर समजाची संख्या फार मोठी आहे. तरीही लोकशाही भारतात या समाजाची मोठी राजकीय उपेक्षा झाली आहे. या पार्श्वभूमीवर सिद्दरामया कर्नाटकातच नव्हे तर सम्पूर्ण भारताच्या दृष्टीने पहिले कुरुबा- धनगर आहेत जे मुख्यमंत्री पदाच्या केवळ रेसमध्येच नाहीत तर जनतेच्या पसंतीत नंबर 1 ला आहेत. सिद्दरामया मास लीडर आहेत. राम मनोहर लोहिया यांच्या पठडीतील ओबीसी चलवळीतील एक अग्रणी आहेत. सर्व समाजात त्यांच्याबद्दल आदर आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे राजकारण्यांच्या भ्रष्टाचाराच्या धुळवडीत ते निष्कलंक आहेत. सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री पदाचे गाजर दाखवित कुरबा समाजाला कॉंग्रेसकडे वळवुन कर्नाटक विधानसभा ताब्यात घेण्याचा प्रयत्न कॉंग्रेस करीत आहे. ते उपमुख्यमंत्री झाले. परंतु देवेगौडापासून सिद्धरामय्यांना कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्रीपद हुलकावणी देत आहे. सिद्धरामय्यांना प्रवेश घेतल्यापासून कॉंग्रेस अंतर्गत मोठा विरोध होत गेला. यातून मार्ग काढीत सिद्धरामय्या कॉंग्रेस पक्षाच्या विरोधी पक्षनेतेपदी पोहोचले. सुरवातीला मल्लिकार्जुन खरगे (एस.सी.) कॉंग्रेस अध्यक्ष होते. धर्मसिंह – खरगे याना दिल्लीत पाठविण्यात आले. यामुळे सिद्धरामय्यांची कॉंग्रेसमधील वाटचाल सोपी झाली. नंतर (ब्राह्मण) देशपांडे यांना कॉंग्रेस अध्यक्ष करण्यात आले. आता (एस.सी.) परमेश्वरन कॉंग्रेस अध्यक्ष आहेत. सिद्धरामय्या केवळ कुरबर नव्हे तर सर्व समाजात लोकप्रिय आहेत. त्यांचे हितशत्रू ही बरेच आहेत. जातीय आहेत तसेच व्यक्तिगत आणि राजकीय विरोधकही आहेत. २००८ च्या निवडणूकी नंतर कुरबर-ओबीसी मते मिळवण्यात अपयश आल्याने कॉंग्रेस सत्तेवर येवू शकली नाही असा आरोप  खरगे यानी सिद्धरामय्या याना उद्देशुन केला. त्यावेळी सिद्धरामय्या संतप्त झाले होते. २००८ च्या निवडणूकी पूर्वीही तिकिट वाटपावरून सिद्धरामय्या संतप्त होवून दिल्ली येथील कॉंग्रेस बैठक सोडून गेले. तेव्हा ऑस्कर फर्नाडिस यांनी अक्षरश: विमानतळावर जावुन बैठकीस परत नेले होते. परराष्ट्रमंत्रीपद सोडून कर्नाटक चे माजी मुख्यमंत्री एस एम कृष्णा राज्यात परतले आहेत. लोकप्रिय सिद्धरामय्या कॉंग्रेस चे स्टार कॅंपेनर आहेत. सत्तेवर कोणता पक्ष येणार हे अजुन गुलदस्त्यात आहे. परंतु कॉंग्रेस सत्तेवर आली तर मुख्यमंत्री कोण बनणार हा कळीचा प्रश्न बनला आहे. कुरबा समाज सिद्धरामय्या मुख्यमंत्री होणार असे समजून हुरळून गेला आहे एवढे मात्र नक्की. सुवर्णा टीवी तर्फे एक सर्व्हे घेण्यात आला. जनतेची पसंती विचारण्यात आली. तेंव्हा जनतेच्या पसंतीत सिद्दरामया नंबर एक वर असल्याचे दिसले. सिद्दरामया यांना सर्वात जास्त 19 टक्के जनमत मिळाले. कर्नाटकच्या आजी - माजी मुख्यमंत्र्यांना सिद्दरामया यांच्यापेक्षा खालची पसंती मिळाली. माजी पंतप्रधान देवेगौड़ा पुत्र कुमारस्वामी तसेच भाजपला सत्ता सोपानावर नेणारे येडीयुरप्पा हे देखील सिद्दरामया यांच्या पेक्षा मागे पडल्याचे दिसते. नुकत्याच झालेल्या जन मत चाचणीत ३०% जनमताने सिद्धरामय्यांना पुढील मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दिली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये सिद्दरामया जनतेच्या पसंतीत नंबर 1 आहेत हे आज दिसत आहे. परंतु कॉंग्रेसचे राजकारण पसंतीत त्यांना कोणत्या नंबरवर ठेवते, यावरच सिद्दरामया यांचे मुख्यमंत्रीपद ठरणार आहे. निष्टावंताना मुख्यमंत्री करण्याची कांग्रेसची परंपरा आहे. सिद्धरामय्या यात कोठे बसतात, हे कॉंग्रेस फक्त श्रेष्ठीनाच माहीत आहे.
कुरबा सर्वात मोठया लोकसंख्येची जात असो – नसो. परंतु लिंगायत आणि वोक्कालिगा नंतर कुरबांची संख्या मोठी आहे, असे सर्वमान्य मत आहे. अशा कुरबा समाजाचे कर्नाटक राज्याच्या सत्तेच्या राजकारणात काय स्थान आहे ? कर्नाटक विधानसभेत कुरबा समाजाची संख्या घटती आहे. कुरबा समाजाच्या आमदारांची संख्या पूर्वीच्या १४ वरून २००८ साली ६ वर आली आहे. के एम कृष्णमूर्ति (कॉंग्रेस – कडूरे), के ईश्वरप्पा (बिजेपी –शिमोगा), वरतुर प्रकाश (अपक्ष – कोलार), बंडप्पा काशेमपुर (जेडीएस – बिदर), सुरेशबाबू (बिजेपी –चिक्कनायकनहल्ली) आणि सिद्धरामय्यां (कॉंग्रेस - वरुणा) असे ६ कुरबा निवडून आले. कुरबर समाजात आपले विशेष स्थान प्राप्त करणार्या माजी मंत्री –आमदार एच एम रेवण्णा यांचा बेंगलुरु शहरातून पराभव झाला. २००९ साली एच. विश्वनाथ कॉंग्रेसतर्फे बिजेपीचे खासदार श्री विजयशंकर यांचा पराभव करुन खासदार झाले. दोन कुरबा मधे येथे लढत झाली. सिद्धरामय्यांचा या बाबतीतला लढा सर्वाना माहित आहे. कोप्पळ येथून के विरुपक्षप्पा यांना तर बेळगाव येथून अमरसिंह पाटील यांना कॉंग्रेसने उमेदवारी नाकारली. लोकसभा - २००४ साठी विलासराव देशमुख कर्नाटकचे कॉंग्रेस पक्ष निरक्षक होते तर पृथ्वीराज चव्हाण २००९ – लोकसभे साठी निरक्षक होते. २००८ – विधानसभेसाठी पतंगराव कदम कॉंग्रेसचे बेळगाव जिल्हा निरक्षक होते. ही अशी कॉंग्रेसची राजनीती असते. सिद्धरामय्या यावेळी कॉंग्रेस तर्फे मुखमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. देवेगौडा आणि जेडीएस तर्फे मानभंग झालेल्या सिद्धरामय्या यांना कॉंग्रेस सत्तेवर येवून मुख्यमंत्री करणार का हाच कर्नाटक राज्याच्या जनतेसमोर विशेषत: कुरबा समाजासमोर “यक्षप्रश्न” पडला आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील आणि त्यामधील रामदुर्ग तालुक्यातील सत्तेच्या राजकारणाचा मागोवा घेत वर्तमान तपासण्याचा प्रयत्न या लेखातून केला जाणार आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचा रामदुर्ग पॅटर्न...बेळगाव जिल्ह्यात एकुण १८ विधानसभा मतदार क्षेत्र आहेत. बेळगाव जिल्हा कुरबर-धनगर बहुल क्षेत्र आहे. बॅकुड गौड म्हणून सुप्रसिद्ध असणार्या कै. वसंतराव पाटील यांचे बेळगाव आणि कर्नाटक राज्यातील राजकारणात एक वेगळेच महत्व त्याकाळी होते. चिक्कोडी लोकसभा क्षेत्र तसेच रायबाग, कुडची विधानसभा क्षेत्र राखीव करुन वसंतराव पाटील आणि कुरबर-धनगर समाजाचा लोकशाही द्वारे  सत्तेच्या राजकारणाचा दरवाजा बंद केला गेला. महाराष्ट्रातही धनगर बहुल विधानसभा (माण) लोकसभा (पंढरपुर) क्षेत्र राखीव केल्याचे दिसते. २००८ साली विधानसभा निवडणूकीसाठी कॉंग्रेसने एकही कुरबा उमेदवार दिला नाही. भाजपा तर्फेही अरबांवी मधून विवेक पाटील या एकमेव कुरबा ला उमेदवारी दिली गेली. कॉंग्रेस तर्फे उमेदवारी नाकारले गेलेल्या माजी आमदार रमेश कुडची यांना जेडीएस ने उत्तर बेळगाव साठी उमेदवारी दिली. रमेश कुडची यांचे शिष्य मानले जाणार्या तसेच जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत मानले जाणार्या फिरोज सेठ यांनी त्यांचा पराभव केला. कर्नाटक राज्य कुरबर संघाचे माजी अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी कॉंग्रेसकडे निपाणी मधून उमेदवारी मागितली होती. परंतु काकासाहेब पाटील यांच्यासमोर त्यांची डाळ शिजली नाही. अरबावीं विधानसभा क्षेत्रात भाजपाचे विवेक पाटील यांचा जेडीएस च्या भालचंद्र जारकीहोळी यांनी पराभव केला. कॉंग्रेसचे विरन्ना कौजलगी तिसर्या नंबरला फेकले गेले. भालचंद्र जारकीहोळीनी जेडीएस चा त्याग केला व भाजपात प्रवेश करुन मंत्री झाले. त्यामुळे याच मतदारसंघात डिसेंबर २००८ मधे पोटनिवडणूक झाली. यावेळी विवेक पाटील कॉंग्रेसतर्फे तर भालचंद्र जारकीहोळी भाजपातर्फे लढले. मोठी प्रशासकीय सेवेचा त्याग करुन राजकारणात उतरलेल्या कुरबा समाजाच्या अरविंद दळवाई यांना जेडीएस ने उमेदवारी दिली. याप्रकारे अरबावीं विधानसभा क्षेत्रात दोन कुरबा विरुद्ध एक वाल्मीकी असा लढा झाला. भाजपाचे भालचंद्र जारकीहोळी कॉंग्रेसचे विवेक पाटील यांचा आणि जेडीएस च्या अरविंद दळवाई यांचा पराभव करुन मंत्रिपद राखले. कुरबा अमरसिंह पाटील कॉंग्रेस तर्फे एकदा खासदार झाले, दुसर्यांदा पराभूत झाले. चिक्कोडी -रायबाग – कुडची सोडून विवेक पाटील यांना गोकाक मधील अरबावीं विधानसभा क्षेत्रात यावे लागले. याप्रमाणे राजकीय उपेक्षित कुरबा समाजाला परागंदाही व्हावे लागल्याचे दिसते. याप्रकारे १८ विधानसभा क्षेत्रांच्या बेळगाव जिल्ह्यात कुरबा समजाला कॉंग्रेस तर्फे शून्य, भाजपा व जेडीएस तर्फे प्रत्येकी एक अशी उमेदवारी दिली गेली. अशा प्रकारे बेंगळूर विधानसभेत कुरबा बहुल बेळगाव जिल्ह्यातून एकही आमदार गेला नाही. तात्पर्य, कर्नाटक राज्याच्या सत्तेच्या राजकारणात कुरबा समाजाचे स्थान काय आहे, याचे बेळगाव जिल्हा हे उत्तम उदाहरण ठरते.

राष्ट्रीय समाज पक्षाचा रामदुर्ग पॅटर्न...

बेळगाव जिल्हा - एकुण विधानसभा जागा- 18
रामदुर्गा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2008

(मतदान दि 25/05/2008)


पक्ष
उमेदवार
मते

कोंग्रेस
अशोक पट्टण
49158

बिजेपी
महादेव यदावाड
48741

जेडीएस
हिरेरेड्डी
3523

आरएसपी
सौ सुरेखा बिरप्पा मिडकनट्टी
2283

अपक्ष
डॉ कुलगोड
1955

बीएसपी
शंकर मुनवळी
1187

अपक्ष
बसप्पा यरगट्टी
650

अपक्ष
महांतेश देसाई
520

अपक्ष
निंगाप्पा मादर
497


एकुण गाव
134


एकुण मतदान केंद्र
166


एकुण मते
108762

या पार्श्वभुमीवर २५ मे २००८ रोजी लढवील्या गेलेल्या रामदुर्ग विधानसभा क्षेत्रातील निवडणूक आणि त्याचा निकाल एक वेगळेच राज-गणित समोर मांडतो. रामदुर्ग विधानसभा क्षेत्रात एकुण ९ उमेदवार रिंगणात होते. कॉंग्रेस – अशोक पट्टण, भाजप – महादेव यादवाड, जेडीएस – हिरेरेड्डी, बसपा – शंकर मूनवळी असे चार पक्षीय तसेच डॉ. कुलगोड एक स्थानिक मातब्बर - अपक्ष उमेदवार रिंगणात होते. डॉ. कुलगोड सहीत कॉंग्रेस, भाजपा, जेडीएस उमेदवारांनी पैशाचा आणि प्रचाराचा पाउस पाडला, असे म्हटले जाते. सुश्री मायावतींच्या कर्नाटक भेटीमुळे वातावरण निर्माण झाल्यामुळे बसपाचाही प्रचार होता. कॉंग्रेस, भाजपा, जेडीएस या सर्व पक्षाचे उमेदवार लिंगायत होते. या मतदारसंघात  लिंगायत नंतर कुरबा समाज मोठा आहे.(४० हजार पेक्षा जास्त) एम. चंदरगी गावच्या कुरबा समाजातील सौ. सुरेखा बिरप्पा मिडकनट्टी यांनी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. कप-बशी हे पक्षाचे चिन्ह मिळविले. मर्यादित साधने व पुरेसा पैशा अभावी रामदुर्ग तालुक्यातील प्रत्येक गावी त्या एक वेळीच पोहोचू शकल्या. महिला सक्षमीकरण तसेच महिला आरक्षणाची चर्चा देशभर होत करणार्या प्रमुख राजकीय पक्षांनी बेळगाव जिल्ह्यातील १८ विधानसभा क्षेत्रातून महिलाना उमेदवारी दिलेली आढळत नाही. या पार्श्वभुमीवर राजकीय उपेक्षित कुरबा समाजातील एका महिलेला उमेदवारी देवुन राष्ट्रीय समाज पक्षाने तशी क्रांति केली होती. कर्नाटक विधानसभेत जावून बसण्याचा मलाही अधिकार आहे, असेच जणू सौ सुरेखा बिरप्पा मिडकनट्टी या कुरबा महिलेने या निवडणूकीत संदेश देण्याचे काम केले. श्री व सौ मिडकनट्टी या पती –पत्नीनी मिळून गावो –गावी प्रचार केला. लोकांनी त्यांना उस्फुर्त साथ दिली. लिंगायत आदि उच्च जातीय मानले जाणार्या समाजातुन देखील महिलांची राजकारणात उपेक्षाच केली जात असल्याचा अनुभव असल्याने सौ सुरेखा बिरप्पा मिडकनट्टी यांचे  सर्व सामाजिक स्तरातुन कौतुक केले गेले. प्रचार माध्यमानी या क्रांतिची दखल घेतलेली दिसत नसली तरी मतदारानी घेतली होती, असे दिसते. रामदुर्ग विधानसभा निवडणूकीचा निकाल हेच सांगतो. देशाचे पंतप्रधानपद आणि कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्रीपद भोगणार्या जेडीएस च्या उमेवाराला, माजी आमदार हिरेरेड्डीना ३५०० मते मिळाली होती. देशभरातील वातावरण ढवळणार्या बसपाच्या शंकर मूनवळी या उमेदवाराला ११87 मते तसेच डॉ. कुलगोड सारख्या मातब्बर उमेदवाराला १९५५ मते मिळाली असताना रासपाच्या सौ सुरेखा बिरप्पा मिडकनट्टी यांनी २२८३ मते मिळवून क्रांति केली होती. राजकीय वारसा, परंपरा तसेच भरपूर साधने – पैसा असणार्या प्रस्थापित राजकीय पक्ष आणि उमेदवारांसमोर सौ सुरेखा बिरप्पा मिडकनट्टीची २२८३ मते म्हणजे एक निवडणूक क्रांति होती. परंतु याची नोंद कोणी घेतली नाही. पत्रकारानी घेतली नाही, राजकीय समिक्षकांनी घेतली नाही. दुर्भाग्य म्हणजे कुरबा समाजानेही याची योग्य अशी दखल घेतली नाही.५ मे २०१३ रोजी कर्नाटक विधानसभा निवडणूक लढविली जाणार आहे. उमेदवारी अर्ज १७ एप्रिल पर्यंत दाखल केले जातील. २० एप्रिल रोजी निवडणूक समरांगणाचे चित्र स्पष्ट होईल.

२० जानेवारी २०१२ आणि २२ जानेवारी २०१३ अशी लागोपाठ २ वर्षे बेळगाव येथे २ मोठ्या सभा घेवून कुरबा समाजाने राजकीय भागीदारी बद्दल सर्वपक्षांविरुद्ध आवाज उठविला. या दोन्ही सभांमागे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या द्वारे गेली ५ वर्षे सातत्याने राष्ट्रवीर संगोळी रायन्नाच्या प्रेरणेने चालविल्या जाणार्या चळवळीचा मोठा वाटा आहे. २००८ सालापासुन मा. जानकर व त्यांचे सहकारी नंदगड – संगोळी-कित्तुर गावी येत आहेत आणि देशासाठी बलीदान देणार्या संगोळी रायन्नाचा राज्याभिषेक करुन लोकशाही भारतावर राज्य करण्याचा आपलाही जन्मसिध्द अधिकार असल्याचे सांगत आहेत. या चळवळी मधेच सौ सुरेखा बिरप्पा मिडकनट्टी यांच्या उमेदवारी चे “कार्य कारण भाव” आहे, मुळ आहे, एका क्रांतिचे बीज आहे.कर्नाटक विधानसभा निवडणूक-२००८ रासपाचे उमेदवार...

सौ सुरेखा बि. मिडकनट्टी
रामदुर्ग
२२८३
कुरबर 
सो मायावती कोकाटे
आळंद
२४१२
एस. सी.
सायबन्ना औटी
अफझलपुर
१७०६
लिंगायत
भीमन्ना पुजारी
इंडी
११०१
धनगर

रामदुर्ग विधानसभा क्षेत्रातून यावेळीही कॉंग्रेस, भाजपा, जेडीएस तर्फे उमेदवार उभे केले जातील. त्यात केजेपी आणि बीएसआर कॉंग्रेसची भर पडेल. राष्ट्रीय समाज पक्षातर्फे देखील कर्नाटक राज्यातून उमेदवार निवडीची प्रक्रिया चालू असल्याचे सांगितले जाते. जास्तीत जास्त जागा लढविण्याचा इरादा पक्षाचे राज्याध्यक्ष गणेशराम देवासी यांनी केला आहे. बेळगाव मधुनही जास्तीत जास्त जागा लढवू असा विश्वास पक्ष जिल्हाध्यक्ष हनुमंत पुजारी यांनी केला आहे. २००३ साली राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना झाली, दिल्लीत पक्षाची नोंद केली. २००४ सालापासून कर्नाटक राज्यात राष्ट्रीय समाज पक्षातर्फे निवडणूका लढविल्या जात आहेत. २००८ साली रामदुर्ग सहित ४ विधानसभा जागा रासपा ने लढविल्या. अरबावी क्षेत्रातील पोटनिवडणूकीत पराभूत झालेले अरविंद दळवाई, रामदुर्ग विधानसभा क्षेत्रातून जेडीएस तर्फे निवडणूक लढविण्यास उत्सुक होते. गेली वर्ष-दिड वर्ष त्यांचे तसे प्रयत्न चालू आहेत. मुळच्या गोकाक क्षेत्रात राजकीय डाळ शिजणार नाही हे ओळखुन कुरबा समाजाचे अरविंद दळवाई रामदुर्गकडे वळले आहेत. अरविंद दळवाई तरुण आहेत, विचारवंत आहेत. सामाजिक – सांस्कृतिक चळवळीचे त्यांना भान आहे. प्रशासकीय सत्तेचा आणि त्याद्वारे प्राप्त केली जाणार्या संपत्तीचा त्याग करुन, भ्रष्ट मानले जाणार्या राजकारणात त्यांनी प्रवेश केला आहे. ज्या  पक्षाच्या माध्यमातून एवढा मोठा निर्णय घेतला, त्या जेडीएस पक्षाने रामदुर्ग विधानसभा क्षेत्रातून अरविंद दळवाई यांना उमेदवारी नाकारली. अरविंद दळवाईनी जेडीएस चा त्याग केला. बीएसआर कॉंग्रेस ची उमेदवारी त्यांनी स्विकारलेली दिसत नाही. रामदुर्ग विधानसभा क्षेत्रातून २००८ साली कुरबा समाजातील सौ. सुरेखा बिरप्पा मिडकनट्टी यांनी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे निवडणूक लढविली. क्रांतिकारक ठरावी अशी मते मिळवली. रामदुर्ग विधानसभा क्षेत्रातून राष्ट्रीय समाज पक्षातर्फे अरविंद दळवाई यांनी निवडणूक लढवावी अशी विनंती रासपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. महादेव जानकर यांनी केली आहे. २०१२ साली एकत्रितपणे त्यांनी बेलगाव येथे सभा घेतली होती. रासपाचा रामदुर्ग पॅटर्न ने राजकारणाला एक वेगळी दिशा दाखविली आहे. सौ. सुरेखा बिरप्पा मिडकनट्टी ला मिळालेली २२८३ मते म्हणजे नोट ला हरवून वोट जिंकू शकते, असे सांगणारा “होकायंत्र” ठरला आहे. तसेच भारतीय मतदार – भारतीय लोकशाही यासाठी एक सुचिन्ह ठरावी अशी ही बाब रामदुर्ग पॅटर्न ने दाखविली आहे. देशातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यास कर्नाटक ची भूमी सुपिक ठरेल असेच रामदुर्ग पॅटर्न सांगत आहे. ५ मे २०१३ च्या मतदानाने रामदुर्ग पॅटर्न पुढे जाणार की मागे येणार, हे मात्र रामदुर्ग चे मतदार आणि अरविंद दळवाई यांच्या हाती आहे.

      

- एस अक्कीसागर, मुंबई

दिनांक – ३१ मार्च २०१३

No comments:

Post a Comment