Thursday, June 14, 2012

बदल आम्ही घडविणार... - महादेव जानकर


महादेव जगन्नाथ जानकर
संस्थापक / राष्ट्रीय अध्यक्ष , राष्ट्रीय समाज पक्ष

जन्म : 19 एप्रिल 1968
जन्म स्थळ : मौजे वाढे , जि . सातारा
गाव : पळसावडे, पो. देवापुर, ता. माण , जि . सातारा
शिक्षण : बी. ई. ( वालचंद कॉलेज , सांगली )


कॉलेज जीवनातच विद्यार्थी नेतृत्व म्हणून पुढे आले. 1988 पासून सामजिक कार्यात प्रवेश.

लग्न करणार नाही , घरी जाणार नाही, नातेवाईकांशी संबंध ठेवणार नाही, स्वताची संपत्ति बनवणार नाही, राष्ट्रीय समाजाला सन्मान - सत्ता मीळवून देण्याचे काम आजन्म करीन... अशी शपथ 1988 साली घेतली. आजपर्यंत जानकर या शपथेला जागले आहेत. निर्धार पक्का असल्याचे सिद्ध झाले आहे.

यशवंत सेनेच्या माध्यमातून सामाजिक जागृतिचे काम सुरु केले. धनगर समाजाबरोबर इतर राष्ट्रीय समाजाला जागृत आणि संघटित केले. 29 ऑगस्ट 2003 साली राष्ट्रीय समाजाची पक्षाची स्थापना केली.

महाराष्ट्राबाहेर पक्षाची उभारणी केली. कर्नाटक, आसाम, मध्य प्रदेश, दिल्ली, गुजरात, प. बंगाल, उत्तर प्रदेश, तमिळनाडू आदि. राज्यात पक्ष पोहचविला.

महाराष्ट्र तसेच अखिल भारतीय पातळीवर अनेक राजकीय / सामजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविले.

अनेक पक्ष असतानाच रा. स .प 'च का ? त्याचा विचार / कार्यक्रम काय ? नेता आणि पक्ष काय ? याबद्दलची माहिती विविध पत्रके आणि मासिक विश्वाचा यशवंत नायक मधून मीळेल.

साभार : बदल आम्ही घडविणार... या पुस्तकांमधून ( प्रकाशित 31 मे 2009 ), लेखक : महादेव जानकर

* http://www.rashtriyasamaj.blogspot.in/2010/02/rayanna-of-sangoli.html

* http://en.wikipedia.org/wiki/Rashtriya_Samaj_Paksha

No comments:

Post a Comment