Sunday, February 19, 2012

महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितींतील रासपचे निकाल


महाराष्ट्रातील महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितींतील रासपचे निकाल जाहीर ....
राष्ट्रीय समाज पक्षाने जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच खाते उघडले !
2 जिल्हा परिषद जागा जिंकल्या ! 3 पंचायत समिति जागा जिंकल्या !!

राष्ट्रीय समाज पक्षाने जागा लढविल्या / निवडून आल्या.
( मतदान  : 7.2.12 , निकाल : 17.2.12)
जिल्हा
जिल्हा परिषद    
पंचायत समिति
निवडून  आले...
उस्मानाबाद
1
2
यवतमाळ
1
2
चंद्रपुर
1
हिंगोली
3
7
नांदेड
1
गडचिरोली
1
2

अमरावती
1
परभणी
1
2
1 जिल्हा परिषद    
बीड
1
-
1 जिल्हा परिषद    
सांगली
2
6
1 पंचायत समिति
सोलापूर
10
11
2 पंचायत समिति
लातूर
1
3
जालना
1
1
पुणे
3
6
अहमदनगर
1
7
मुंबई महापालिका
15 + 1 पुरस्कृत
-
ठाणे महापालिका
3
-

राष्ट्रीय समाज पक्ष निवडणुका जिंकनारा पक्ष बनला !
सातारा, पुणे आणि सोलापूर येथून स्थानिक आघाडी तर्फे रासपने निवडणुका लढविल्या. बाकि सर्व ठिकाणी स्वबलावर रासपने निवडणुका लढविल्या.  इ स 2003 या साली राष्ट्रीय समाज पक्षा’ची स्थापना झाली. येल्डा पंचायत समिति ( बीड ) साठी पहिला राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार निवडून आला. 2009 मध्ये पहिला आमदार ( अहमदपुर, लातूर ) निवडून आला. अनेक ग्राम पंचायत रासपा च्या ताब्यात आल्या होत्या. परंतु मोठा विजय हुलकावनी देत होता. यावेळी मात्र  राष्ट्रीय समाज पक्ष अनेक ठिकाणी विजया जवळ पोहोचला. किंबहुना तब्बल ५ जागेवर विजय मिळवून राष्ट्रीय समाज पक्ष निवडणुका जिंकनारा पक्ष बनला. महाराष्ट्रातील महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितींचे निकाल जाहीर  झाले. रासप च्या ए बी फॉर्म ची सम्पूर्ण महाराष्ट्रातुन मागणी वाढली. अनेक ठिकाणी ए बी फॉर्म वाटले गेले. उमेद्वारानी अर्ज दखल केले. काही मेनेज झाले. काही मैदानात टिकले. राष्ट्रीय समाज पक्षाने जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच खाते उघडले व 2 जागा जिंकल्या. तसेच्ग 3  जागा पंचायत समितित जिंकल्या. अनेक ठिकाणी रासपचे उमेदवार दुसर्या क्रमांका वर होते. दिग्गज बाहुबली तसेच पैसेवाल्या उमेदवारा विरुद्ध कडवी झुंज दिली. मा. महादेव जानकर १० दिवसात १७ जिल्हे व ३ महापालिका क्षेत्रात प्रचारा साठी फिरले. त्यांच्या अनेक सभा झाल्या. ते हजारों कर्यकर्त्याना भेटले आणि लाखो जनते समोर गेले. राष्ट्रीय समाज पक्ष एक लढनारा पक्ष आहे, अशी ओळख जनते समोर नेवु शकले. आता ५ जागेवर विजय मिळवून राष्ट्रीय समाज पक्ष निवडणुका जिंकनारा पक्ष अशी ओळख हि देवू शकला. अत्यंत प्रतिकूल परिस्थिति असताना किमान साधन वाल्या रासपाची कामगिरी केवळ दखल पात्रच नाही तर कौतुकास्पद ठरते. बीड जिल्हा परिषदसाठी निवडून आलेला बाळासाहेब  दोडतले वयाच्या १६-१७ वर्षापासून मा. महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली खान्द्याला खान्न्दा लावून पक्षाचे काम करीत आहे.  बाळासाहेब  दोडतले चा विजय हा एका कार्यकर्त्याचा विजय आहे. महादेव जानकर’सारखा नेता आणि बाळासाहेब  दोडतले’सारखा कार्यकर्ता असे आदर्श समीकरण बनल्यास राज्याचे नव्हे देशाचे हि राजगणित बदलवु शकते, असा निष्कर्ष काढने मात्र वावगे ठरणार नाही. हा धडा रासपचे नेता / कार्यकर्त्यांनी या निवडणूकीतून घेतला तर पक्ष वाटचालीला वेग येईल, असेही म्हणु शकतो. सातारा व बारामती मध्ये आघाडी मधून रासपच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक लढविली. पक्षाच्या ए बी फॉर्म वर त्यांनी निवडणूक न लढविल्या कारणाने त्यांची दखल घेतली जावू नये, असे पक्षाचे अध्यक्ष मा. महादेव जानकर यांनी यशवंत नायक’शी बोलताना सांगितले.

 रासपा विजयी उमेदवार  :

1.  अंबाजोगाई - मोरेवाडी मधून बीड जिल्हा परिषदसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे श्री. बाळासाहेब  दोडतले 5275 मते मिळवुन विजयी  झाले. 
2. गंगाखेड मधून परभणी जिल्हा परिषदसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या सौ. संगीता भगवान सानप 5860 मते मिळवुन विजयी झाल्या.  
3. सांगली जिल्ह्यातून आटपाडी तालुका पंचायत समितीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या सौ. मनीषा तानाजी यमगर विजयी झाल्या.  
4. सोलापूर जिल्ह्यातून माळशिरस तालुका  पंचायत समितीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे श्री. बाळासाहेब लवटे यांचा विजय झाला.
5. सोलापूर जिल्ह्यातून माळशिरस पंचायत समितीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या सौ. शीतल पालवे विजयी झाल्या. 
-          यशवंत नायक रिपोर्ट

No comments:

Post a Comment