Sunday, September 11, 2011

राजे उमाजी नाईक जयंती उत्साहात साजरी...

भिवडी येथे राजे उमाजी नाईक सांस्कृतिक भवन निर्माणासाठी रासपा साथ देईल !

- महादेव जानकर

पुणे:(प्रतिनिधी) भिवडी येथे राजे उमाजी नाईक सांस्कृतिक भवन निर्माणासाठी रासपा साथ देईल, असे आश्वासक उद्गार राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. महादेव जानकर यांनी येथे काढले. राजे उमाजी नाईक यांचे भिवडी या जन्मगावी (तालुका पुरंधर) राष्ट्रीय समाज पक्षा तर्फे सालबादा प्रमाणे यंदाही दिनांक 7 सप्टेंबर 2011 रोजी राजे उमाजी नाईक यांची 220 वी जयंती साजरी करण्यात आली. क्रांतीवीर उमाजी नाईक संघठना, महाराष्ट्र राज्य. अध्यक्ष मा. आनंता बापु चव्हाण यांनी भिवडी येथे राजे उमाजी नाईक सांस्कृतिक भवन व्हावे, अशी मागणी केली तसेच रासपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. महादेव जानकर यांची साथ मागितली. त्याला प्रतिसाद देताना आपल्या भाषणात मा. जानकर यांनी वरील उद्गार काढले. हा देश माझा आहे आणि या देशावर राज्य करण्याचा अधिकार आमचा आहे, असे इंग्रजाना ठणकावुन सांगनार्या आद्ध्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या वारसदार रामोशी समाजाची उपेक्षा का आणि कोण करीत आहे ? असा सवाल यावेळी मा. जानकर यांनी केला. लोक जाग्रुती व्हावी उद्देशाने रासपाने राजे उमाजी नाईक यांची जयंती भिवडी येथे सर्व प्रथम सुरु केली. इंग्रज गेले परंतू राज्य कोणाचे आले, याचा विचार झाला पाहिजे, असे आवाहन ही मा. जानकर यांनी केले. रामोशी सेवा महासंघाचे अध्यक्ष मा.कैलाश भंडलकर यांनी महादेव जानकर यांच्या नेत्रुत्वाखाली महाराष्ट्र विधान सभेवर पिवळा झेंडा फडकला पाहिजे, असे उद्गार काढले. रामोशी समाज महासंघाचे अध्यक्ष मा. अशोक बोडरे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. मा. बोडरे यांनी राजे उमाजी नाईक यांची जयंती भिवडी येथे साजरी करीत समाज जाग्रुतीची मशाल तेवत ठेवल्या बद्दल मा. जानकर याचे अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी रासपचे राष्ट्रीय खजिनदार मा. पुंडलिक मामा काळे हे होते. क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या 220 व्या जयंती निमित्त 220 मशाली घेवुन 220 युवकांनी सासवड ते भिवडी अशी पदयात्रा काढली. डा.आंबेडकर यांनी देखील क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या कार्याची नोंद घेतली असल्याचा उल्लेख मा. नारायण ताक (सर) यांनी आपल्या उद्बोधक भाषणात केला. रामोशी सेवा संघ महाराष्ट्र राज्य, क्रांतीवीर उमाजी नाईक संघठना महाराष्ट्र राज्य, नरवीर उमाजी नाईक मंडळ, अखिल भारतीय रामोशी महासंघ, रामोशी समाज महासंघ आदी विविध संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, समाज बांधव राजे उमाजी नाईक जयंती कार्यक्रमात सहभागी झाले होते. महाराष्ट्र रासपा सचिव प्रा. सुभाष भिंगे, मिथुन आटोळे आदींनी आपले विचार मांडले. महाराष्ट्र रासपा प्रवक्ते मा. निखील भातंब्रेकर, क्रांतीवीर उमाजी नाईक ग्रंथालय मुंबईचे अध्यक्ष मा. लालासाहेब भंडलकर, पश्चिम महाराष्ट्र रासपा महिला आघाडी प्रमुख श्रीमती कामिनी पाटील, सातारा रासपा युवा नेता सचिन सुपेकर, मराठवाडा रासपा प्रमुख मा. बाळासाहेब दोडतले, भारत नरुटे, बापुराव सोनवलकर, संदिप चोपडे, संभाजी हुलगे, एकळ सर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र रासपा उपाध्यक्ष दशरथ राउत यांनी सुत्र संचलन केले तर महाराष्ट्र रासपा उपाध्यक्ष गोविंदराम शुरनर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment