Saturday, August 21, 2010

राजे उमाजी नाईक जयंती सोहळा ...


जय मल्हार बोलो ....
जय राष्ट्रीय समाज बोलो...
भिवडी - पुणे चलो !''आमच्यावर राज्य करणारे
हे
गोरे कोण हाय ?हा देश आमचा हाय,
आम्ही
इथले राजे हाय ! "

-- राजे उमाजी नाईक


राष्ट्रीय समाज पक्ष
आयोजित
आद्य स्वराज्य नायक
राजे उमाजी नाईक जयंती सोहळा...


सप्टेंबर २०१०
वेळ - दुपारी वा.
स्थळ - मु. भिवडी ता. पुरंदर जि. पुणे


मुख्य मार्गदर्शक :
मा. महादेव जानकर, राष्ट्रीय अध्यक्ष - राष्ट्रीय समाज पक्ष
प्रमुख उपस्थिती :
मा. बाबासाहेब पाटील, आमदार - राष्ट्रीय समाज पक्ष
कार्यक्रम अध्यक्ष :
मा. पुंडलिक मामा काळे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष- राष्ट्रीय समाज पक्ष
निमंत्रक : राष्ट्रीय समाज पक्ष, महाराष्ट्र प्रदेश

==================================================================

भारतीय स्वातंत्र्याचे आद्यक्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांचे अपूर्ण राहिलेले स्वराज्याचे स्वप्न रा.स.पा पूर्ण करेल
-- महादेवजी जानकर

दि. ७ सप्टेंबर . २०१०, पुणे / भिवडी (प्रतिनिधी) :


द्यक्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांची जयंती, त्यांच्या मुळ गावी भिवडी ता. पुरंदर येथे मोठ्या उत्साहात रा.स.पा तर्फे साजरा करण्यात आली .या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना महादेवजी जानकर म्हणाले कि आज भारतात सर्वसामन्य जनतेचे, ओबीसी / आदिवासी / दलित / अल्पसंख्यकांचे शोषण सुरूच आहे.या शोषित समाजाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीच आपणाला आद्यक्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांच्या स्वप्नातील स्वातंत्र्य आणावे लागतील. ते काम राष्ट्रीय समाज पक्ष पूर्ण करेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर यांनी यावेळी केले. राष्ट्रीय समाज बांधवानी आपल्या मुलांना उच्च शिक्षण देवून , उच्च शिक्षणाच्या मंदिराद्वारे आय.ए.स / आय.पी.स / अधिकारी / कलेक्टर / कमिशनर, जज / वकील, खेळाडू, लेखक / साहित्यकार / पत्रकार, नेते / मंत्री बनविणारे मुल घडवावेत असे त्यांनी यावेळी सांगितले. जेव्हा असे हे घडेल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण शोषणमुक्त राष्ट्रीय समाज निर्माण करू शकतो. त्यासाठी कार्यकर्त्यांनी समाज प्रबोधनाचे कार्य हाती घेवून सत्ता आपल्या ताब्यात घेण्याचे कामाला लागावे, असे आवाहन जानकर यांनी केले.
लालूप्रसाद यादव , मुलायमसिंग यादव, करुणानिधी आणि स्व.कांशीराम यांनी निर्माण केलेली माणसे जर आज संसदेत नसती तर सर्वसामन्यांचे हिताचे कोणतेही बिल पास झाले नसते असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात पुंडलिक मामा काळे यावेळी म्हणाले कि, या क्रांतीकारी राजे उमाजी नाईकांनी इंग्रजांना ठणकावले कि , तुम्ही गोरे कोण ? आम्ही येथील राजे आहोत, तुम्ही या देशातून चालते व्हा, अशा खंबीर राजाचा वारसा महादेव जानकर चालवीत आहेत, त्यात तुम्ही सर्व राष्ट्रीय समाज बांधवांनी सामील होवून, हा आपला लढा यशस्वी करा, असे आव्हान त्यांनी यावेळी केले.
अड़वोकेट शफिक परकार यांनी रासपाची सभासद मोहीम कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्याचे आव्हान यावेळी केले.
स्वामी रामानंद महाराज , नागपूर ( गोधन सुरक्षा आयोगाचे उपाध्यक्ष ) उपस्थितांना उद्देशून म्हणाले कि आमच्या त्यागापेक्षा महादेव जानकर यांचे त्याग महत्वाचे असून ते लोककल्याणाची संपूर्ण क्रांती यशस्वी करू शकतात , त्यामुळे त्यांना आमच्या शुबेच्छा आहेत.
हर्षवर्धन भंतजि ( बौद्ध भिक्षुक ) यावेळी म्हणाले कि सम्राट अशोकाचे खरे वारसदार महादेवजी जानकर असून, समाजानी त्यांच्या कार्यात सहभागी व्हावे.
प्रोफेसर दिगंबर दुरगाडे म्हणाले कि महापुरुषाण्चे स्वप्न हे केवळ वाचन करून पूर्ण होणार नाही तर ते अनुकरणात आणल्याने होणार आहे, ते काम महादेवजी जानकर यांनी हाती घेतलेले आहे. तेच खऱ्या अर्थाने शोषणमुक्त समाज निर्माण करू शकतील , त्यामुळे त्यांना साथ देणे गरजेचे आहे.
आद्यक्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांच्या समाज बांधवांचे येथील जमिनी प्रस्थापितांनी बळकाविले असून ते परत मिळवण्यासाठी सर्व राष्ट्रीय समाज बांधवानी / नेत्यांनी सहकार्य करावे असे बबनराव मांढरे यांनी यावेळी सांगितले.

2 comments:

 1. HAI SIR,I AM GOVINDAN.S IN DHARMAPURI DT.TAMILNADU,MY CAST KURUMANS ( KURUMBAR )ST,MY MOBAIL NO:09543160161,MYGmail :

  govindanjd@gmail.com

  09543160161

  ReplyDelete
 2. नमस्कार साहेब ,
  तुम्ही जे धनगर समाजासाठी जे कार्य करत आहात त्याचा आम्हा सर्व धनगरांना अभिमानाच आहे.हे कार्य तुम्ही अविरत पार पाडत आहात.आणि निश्चितच धनगर समाजाला मानाचं स्थान मिळेल .
  आपला समाजबांधव,
  अभिजीत गोरे
  मो.९४०५७४९९२२
  E-mail:-abhijitgore55@gmail.com

  ReplyDelete