Monday, June 28, 2010


गुजरात राज्यातील आगामी महानगर पालिकांच्या निवडणुका, रासप लढविणार
- मा. प्रकाशभाई शर्मा
गुजरात / बडोदा ( प्रतिनिधी ) : राष्ट्रीय समाज पक्ष गुजरात प्रदेश कमिटीची एक सभा २० जून २०१० रोजी येथील सर्किट हाउस, बडोदा येथे संपन्न झाली. सभेचे अध्यक्षस्थानी गुजरात रासप अध्यक्ष मा. ललीतभाई पटेल होते. सभेमध्ये वर्तमान सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला गेला. राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुका लढविण्याचा आणि रासप राष्ट्रीय कमिटीची सभा बडोदा येथे आयोजित करण्याचा निर्णय गुजरात रासपने घेतला. बडोदा महापालिकेच्या किमान ४० जागी उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतल्याचे बडोदा रासपचे मा. प्रकाशभाई शर्मा यांनी सांगितले. श्री प्रकाशभाई शर्मा यांनी रासपाची पहिली सूची जाहीर केली. या सूची प्रमाणे संजय वाघमोडे, निलेश परमार, शकील खान. प्रकाशभाई शर्मा यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. गुजरात रासप महासचिव संजय वाघमोडे यांनी सभेचे संचलन केले.

No comments:

Post a Comment