Wednesday, June 2, 2010

'महाराणी अहिल्या जयंती' उत्साहात साजरी...

जातीनिहाय जनगणना न झाल्यास देशभर आंदोलन उभारू
-
महादेव जानकर
महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या २८५ व्या जयंतीनिमित्त ३१ मे २०१० रोजी राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे राजमाता अभिवादन सोहळा आणि सत्ता परिवर्तन रैली चे आयोजन केले होते. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून रासपाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मान. महादेव जानकर बोलत होते. " या देशात जनावरांची गणती होते, परंतु माणसांची गणती होत नाही, जाती निहाय जनगणना हि रासपाची आणि रीडालोस ची भूमिका आहे. त्यामुळे जाती निहाय जनगणना न झाल्यास देशभर आंदोलन उभारू ' असा इशारा महादेव जानकर यांनी यावेळी दिला.
रीडालोसचे निमंत्रक खासदार रामदास आठवले प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते. ते म्हणाले ' धनगर, दलित, मुस्लीम, मराठा, माली एकत्र आल्यास महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन घडवून आणणे कठीण नाही.'
रासपाचे नवनिर्वाचित पहिले आमदार बाबासाहेब पाटील
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. कर्जत- जामखेड चे स्थानिक आमदार आणि महाराणी अहिल्याबाई होळकरांचे १३ वे वंशज प्रा. राम शिंदे, रासपाचेराष्ट्रीय महासचिव मान. कैलाश दिवाण ( असनसोल पश्चिम बंगाल ), कर्नाटक रासपाचे अध्यक्ष मान. गणेश देवासी, गुजरात रासपाचे अध्यक्ष मान. ललितभाई पटेल, रिपाई शेतकरी सेल चे प्रमुख दत्ता पडवळ सहित अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. जालना जिल्हा रासपाचे प्रमुख नारायण दादा चाळगे यांनी साडे तीन गुंठे जमिनीची देणगी पक्षाला घोषित केली. आ. बाबासाहेब पाटील, आमदार प्रा. राम शिंदे, रासपाचे नेते कैलाश दिवाण, ललितभाई पटेल,दशरथ राउत, बजरंग खटके, शिवाजी शेंडगे, आदींनी सभेत आपले विचार मांडले. यावेळी अतुल आखाडे, गोविंद शुरनर, होमेश भुजाडे लिखित पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. महादेव जानकर लिखीत 'बदल आम्ही घडविणार' आणि विश्वाचा यशवंत नायक स्टालवर विक्रीस ठेवले होते. या विराट सभेत युवा वर्गाची आणि महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

No comments:

Post a Comment